मनोरंजन
त्या’च्यावरील प्रेमाने शाहरुख भारावला….
वडिल आणि मुलांतील प्रेम जगात कुठेही गेलो तरी सारखेच. पित्याचे मुलावर असणाऱ्या प्रेमाचे वेगळे दाखले देण्याची गरज नाही. प्रत्येक पित्याला आपले मूल तितकेच खास, मग सेलिब्रिटीजही याला अपवाद नाहीत. बॉलिवूडचा किंगखान शाहरुखचा लहान मुलगा अबराम याचा चौथा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. शाहरुखचे अबरामवरील प्रेम अनेकदा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यासमोर आलेले आहेच. या वाढदिवसाच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा दिसून आले.
आता अभिनेत्याच्या मुलाचा वाढदिवस म्हणजे काही विचारायलाच नको. या छोट्या किंगखानला त्याच्या मित्रमंडळींकडून तर शुभेच्छा मिळाल्याच पण शाहरुखच्या चाहत्यांनीही अबरामवर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊसच पाडला. या शुभेच्छांचा स्विकार करताना आपल्या मुलावर असणाऱ्या चाहत्यांच्या प्रेमामुळे शाहरुखही भलताच खूश झाला. त्याने ट्वीटरच्या माध्यमातून आपल्या भावना मांडत आपला आनंद व्यक्त केला.
शाहरुखने म्हणतो, ‘मला वाटले केवळ पालकांनाच माहित असते आपल्या मुलांवर किती प्रेम करायचे, पण अब्राहमच्या वाढदिवसाला त्याला आलेल्या प्रचंड शुभेच्छांनी बाकी सगळेही त्याच्यावर किती प्रेम करतात ते समजले आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे.’
करण जोहर सोशल मिडियावरुन अबरामला शुभेच्छा देणारा पहिला शुभेच्छुक ठरला आहे. त्याने अबरामला खूप शुभेच्छा देत जेमिनी बडी म्हटले आहे. सर्वांना आवडेल असा मुलगा म्हणजे अबराम असा उल्लेख करणने आपल्या ट्वीटमध्ये केला आहे.
करण जोहर आणि शाहरुख खान यांची मैत्री अनेकदा समोर आली आहे. आपल्या आत्मचरीत्रातही करणने शाहरुखने आपल्याला अंडरवर्ल्डमधील लोकांपासून वाचविल्याचे सांगितले आहे. करणनेही अबरामला वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा दिल्या. मागील वर्षी करणने आपल्या वाढदिवसाची पार्टी लंडनमध्ये ‘ए दिल है मुश्कील’ चित्रपटाच्या शुटींगदरम्यान दिली होती. यावेळी आर्यन आणि अबरामही हजर होते.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.