अपराध समाचार
रॅन्समवेअर व्हायरसचा कोकणात हल्ला, ग्रामपंचायतीचा डाटा हॅक
- 193 Views
- May 20, 2017
- By admin
- in अपराध समाचार, देश, समाचार
- Comments Off on रॅन्समवेअर व्हायरसचा कोकणात हल्ला, ग्रामपंचायतीचा डाटा हॅक
- Edit
nobanner
जगभरात थैमान घालणाऱ्या रॅन्समवेअर व्हायरसचा हल्ला आता कोकणातल्या गावात धाडकलाय. सिंधुदुर्गातल्या मऴेवाड ग्रामपंचायतीचा डाटा हॅक झालाय.
हा डाटा पुन्हा देण्यासाठी 300 डॉलर्सची मागणी करण्यात आलीय. यामुळे जिल्हा प्रशासनाची पाचावर धारण बसलीय. कोकणातला हा पहिलाच सायबर हल्ला आहे.
या हल्ल्यामुळे ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे रेकॉर्ड गायब होण्याची भीती व्यक्त केली जातेय. ग्रामपंचायतीत यंत्रणा अपडेट करताना ही बाब लक्षात आली. त्यामुळं ऑफलाईन डाटा लॉक झालाय.
सर्व काम ठप्प झालंय. याबाबतची माहिती मळेवाड ग्रामपंचायतीला मिळताच याबाबत तक्रार नोंदवण्यात आलीय. पण या सायबर हल्ल्यामुळे कोकणात खळबळ माजलीय.
Share this: