Menu

अपराध समाचार
रोहतकमधील महिलेवर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी २ नराधमांना अटक

nobanner

हरियाणाच्या रोहतकमध्ये २३ वर्षीय महिलेवरील सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोन नराधमांना अटक करण्यात आली आहे. सुमित आणि विकास अशी या दोघांची नावं आहेत. सुमितची महिलेबरोबर ओळख होती अशी माहिती सोनीपतच्या पोलीस निरीक्षकांनी दिली आहे. पीडित महिलेचा घटस्फोट झाला होता. ९ मे ला तिचे सोनीपत येथून अपहरण करुन कारने रोहतक येथे आणले अशी माहिती पोलिसांनी दिली.

पीडित महिलेच्या पालकांनी सोनीपत पोलीस ठाण्यात महिलेच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली होती. महिलेवर आधी बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचे डोके पकडून दगडावर आपटण्यात आले. तिच्या डोक्यावर जखमा होत्या असे पोलिसांनी सांगितले. भटक्या कुत्र्यांनी पीडित महिलेचा चेहरा आणि अन्य भागांचे लचके तोडल्याचं आढळलं होतं. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.