मनोरंजन
शाहरुखच्या भेटीसाठी नाशकातील सहा बहिणींचं घरातून पलायन
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या क्रेझी फॅन्सची संख्या काही कमी नाही. शाहरुखच्या चाहत्या
असलेल्या नाशिकमधल्या अशाच सहा बहिणींनी घरातून पलायन केलं आणि त्याला भेटण्यासाठी थेट मुंबईतील ‘मन्नत’ बंगला गाठला. एकाच वेळी घरातल्या सहाही लहान मुली बेपत्ता झाल्यानं त्यांचे कुटुंबीय हबकून गेले आणि पोलिसांचीही झोप उडाली.
नाशिकमधल्या पंचवटीतल्या आरटीओ कॉर्नरजवळ राहणाऱ्या सहा बहिणींनी मंगळवारी रात्री नाशिकच नाही तर कसारा, ठाणे, कल्याण आणि मुंबईतल्या पोलिसांची झोप उडवली. संध्याकाळी राहत्या घरातून बेपत्ता झालेल्या या मुलींच्या काळजीनं त्यांचे कुटुंबियच नाहीत, तर पोलिसही चिंतातुर झाले.
रात्रभर पोलिस त्यांचा शोध घेत होते आणि बुधवारी पहाटे अखेर या बहिणी सापडल्या त्या थेट बॉलिवूडचा सुपरस्टार किंग खान शाहरुखच्या बंगल्यासमोर. तेही टरबूज खात एन्जॉय करताना. या नाशिकहून बेपत्ता झालेल्या मुलीच असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांच्या पथकानं सुटकेचा निश्वास टाकला.
बारा ते पंधरा वर्ष वयोगटातल्या या सहाही बहिणींनी शाहरुखच्या बंगल्यासमोर येण्यापुर्वी सप्तश्रृंगी गडावर जाऊन देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर नाशिकरोड रेल्वे स्टेशन गाठत शताब्दी एक्सप्रेसने मुंबई गाठली. त्यानंतर टॅक्सीने त्या शाहरुख खानच्या बंगला मन्नतवर पोहचल्या. या काळात त्यांचा मोबाईलही स्विच ऑफ झाल्यानं त्यांना शोधून काढणं पोलिसांसाठी आव्हान होतं.
बॉलिवूडच्या सिनेतारकांच्या जबरदस्त फॅन्स असलेल्या या सहाही बहिणी म्हणजे अजब रसायन आहेत. मध्यमवर्गीय घरातल्या या मुलींच्या घरावर बॉलिवूड प्रेमाच गारुड आहे. शाहरुख खान, टायगर श्रॉफ यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक हिरोंच्या त्या जबरी फॅन, तर वडील हिरोईन्सचे.
आपलं बॉलिवुड प्रेम जोपसतानाही स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे, असं समुपदेशन करुन नाशिक पोलिसांनी या मुलींना त्यांच्या पालकांच्या हवाली केलं. नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी तर त्यांना बॉलीवूड स्टार्सशी भेट घालून देऊ, पण परत घरातून पळून जायचं नाही, असं प्रेमळ आश्वासनच दिलं. त्यामुळे या बॉलीवूड फॅन्स बहिणी सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.