Menu

देश
कर्जमाफीवरून पवारांच्या घरी मुख्यमंत्र्यांची बैठक

nobanner

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

शेतकरी कर्जमाफी प्रकरणी ही भेट होणार असल्याचं सांगितलं जातंय. पवार यांच्या ६ जनपथ निवासस्थानी ही बैठक होणार आहे.

या बैठकीला मुख्यमंत्री आणि पवारांसह अजित पवार, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, धनंजय मुंडे उपस्थित असतील.

कर्जमाफीवरून सुकाणू समितीशी चर्चा न करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. त्यामुळे आता राजकीय पक्षांशी चर्चा करून कर्जमाफीचा मुद्दा संपवण्यावर फडणवीस यांनी भर दिलाय.