Menu

देश
शोकाकूल वातावरणात शहीद संदीप जाधव यांना अखेरचा निरोप

nobanner

अमर रहे…अमर रहे… संदीप जाधव अमर रहे या घोषणांनी केळगाव व्यापले होतं. पाकच्या हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप सर्जेराव जाधव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात झाले. यावेळी केळगावावर शोककळा पसरली आहे. अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. या शूरवीराला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक आले होते. दरम्यान, कोल्हापूरचे शहीद जवान श्रावण माने यांच्या पार्थिवावरही आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रावण माने यांचंही पार्थिव त्यांच्या मूळगावी गोगवे इथे दाखल झाले आहे.

संदीप जाधव यांचा मुलगा शिवेंद्र याचा आज पहिला वाढदिवस आहे. दुर्दैवाने मुलाच्या वाढदिवसा दिवशी पित्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे येणार प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होता. काल रात्री संदीप जाधव यांचं पार्थिव औरंगाबादमध्ये दाखल झालं होतं. आज त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात आलं आणि शासकीय इतमामात या वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यात आला.