अपराध समाचार
९ महिन्यांच्या मुलीला चालत्या रिक्षातून फेकून महिलेवर सामूहिक बलात्कार
- 320 Views
- June 06, 2017
- By admin
- in अपराध समाचार, देश, समाचार
- Comments Off on ९ महिन्यांच्या मुलीला चालत्या रिक्षातून फेकून महिलेवर सामूहिक बलात्कार
- Edit
चालत्या रिक्षातून ९ महिनांच्या मुलीला फेकून तिघा नराधमांनी एका महिलेवर बलात्कार केला. फेकलेल्या चिमुकलीचा मृत्यू झाला. २३ वर्षीय महिला मध्यरात्री रिक्षाने आपल्या आईवडिलांकडे जात होती.
पतीचे शेजाऱ्यांशी भांडण झाले होते. त्यानंतर पती कामावर निघून गेला. त्यानंर शेजाऱ्यांनी या महिलेशी भांडण करण्यास सुरुवात केली. पतीशी भांडन झाल्यानंतर शेजारीही भांडू लागल्याने आपल्या ९ महिन्यांच्या मुलीला घेऊन पीडित महिला माहेरी जायला निघाली. त्यावेळी मध्यरात्र होत आली होती.
रिक्षाने माहेरी जाणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. नराधमांनी आधी पीडित महिलेच्या लहानग्या मुलीला चालत्या रिक्षातून बाहेर फेकून दिले. नंतर एका निर्जन स्थळी रिक्षा थांबवून महिलेवर सामूहिक बलात्कार करून ते पळून गेले.
पीडित महिला पतिसोबत बासकुस गावात राहते. २९ मेच्या रात्री तिच्या पतीचे शेजाऱ्यांशी कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर रात्रपाळी असल्यानं तो कामावर निघून गेला. तो जाताच शेजाऱ्यांनी महिलेशी पुन्हा भांडण सुरू केले. भांडणाला कंटाळून ती महिला ९ महिन्यांच्या बाळाला घेऊन माहेरी निघाली होती.
बाळाला मांडीवर घेऊन रिक्षामध्ये बसताच रिक्षातील तिघा तरुणांनी महिलेची छेड काढायला सुरुवात केली. तिनं आरडाओरडा सुरू करताच तिचं बाळही घाबरून रडायला लागलं. त्याबरोबर त्या तरुणांनी बाळाला महिलेकडून खेचून घेत चालत्या रिक्षातून फेकून दिले. त्यानंतर एका निर्जन ठिकाणी रिक्षा थांबवून महिलेवर सामूहिक बलात्कार केला असा आरोप या महिलेने केलाय.
बलात्कारानंतर कशीबशी माहेरी पोहोचल्यानंतर तिने कुटुंबीयांसोबत आयएमटी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात मुलीच्या खुनाचा गुन्हा नोंदविला. दोन दिवसांनी तिने याविषयी आपल्या पतीला सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.