Menu

देश
People behind ‘travesty’ should ‘burn in hell’, says Omar Abdullah

nobanner

कपिल शर्मासाठी मागचे काही महिने वादग्रस्त ठरले होते, सुनील ग्रोवरसोबतही त्याचं भांडण झालं होतं, तर सुनील ग्रोवर आणि काही टीम मेंबर्सला शो सोडावा लागला. नील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्या भांडणानंतर शोमधून गायब असलेला चंदू आता परतणार आहे, सुनील ग्रोवर, चंदन प्रभाकर आणि अली असगर या तीनही जणांनी शो सोडला होता.

सुनील आणि अली गेल्यानंतर टीआरपीच्या स्पर्धेत डगमगणारा कपिल शर्मा शो आता चंदन प्रभाकरच्या आधाराने चालणार आहे. आर्टिस्टच्या नावावर टीममध्ये फक्त कीकू शारदा होते, यात सुमोना आणि रोशेल एवढे दमदार नव्हते की आपल्या दमावर शो सांभाळू शकतील.

तसंही या प्रकरणी अजून चंदन किंवा कपिलकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, चंदन परल्याने शोमध्ये नवं चैतन्य निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.