देश
अकाऊण्टमधील गैरव्यवहार बँकेला 3 दिवसात कळवल्यास पूर्ण भरपाई
बँक खातेदारांना सुरक्षित ऑनलाईन व्यवहार करता यावेत, यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवी नियमावली जाहीर केली आहे. तुमच्या बँक अकाऊंटवरुन गैरव्यवहार करण्यात आल्यास तीन दिवसांत बँकेला त्याविषयी माहिती द्यावी, तसं केल्यास तुम्हाला कोणतंही नुकसान सहन करावं लागणार नाही.
विशेष म्हणजे तीन दिवसांत तुम्ही बँकेला अशा चुकीच्या व्यवहारांविषयी माहिती दिली, तर दहा दिवसांत संपूर्ण रक्कम तुमच्या खात्यात क्रेडीट होईल. तर थर्ड पार्टी फ्रॉडविषयी चार ते सात दिवसात ही सूचना बँकेला दिल्यास ग्राहकांना 25 हजार रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.
वेळेत ही सूचना बँकेला दिली नाही, तर खातेदारालाच संपूर्ण नुकसान सहन करावं लागणार आहे. ग्राहकाच्या हलगर्जीने (पेमेंट विषयीचे डिटेल्स शेअर केल्याने) हे गैरव्यवहार झाले असतील, तर मात्र फटका तुम्हालाच सहन करावा लागेल.
आरबीआयनं काढलेल्या नव्या नियमानुसार बँकांना ग्राहकांचे मोबाईल नंबर त्यांच्या अकाऊंट नंबरशी संलग्न करावे लागणार आहेत. बँकांनी केलेल्या मेसेजेसना रिप्लाय करण्याचा पर्याय द्यावा अशीही शिफारस करण्यात आली आहे.
यापुढे तुमच्या अकाऊंटवरुन चुकीचे व्यवहार कोणामार्फत करण्यात आले आणि त्याची माहिती वेळेवर तुम्ही बँकेला दिलीत, तर ते नुकसान बँक स्वतः सहन करणार आहे. बँकांना इन्शुरन्स सेटलमेंटची वाट न पाहता ही रक्कम 10 दिवसांत ग्राहकाच्या खात्यात जमा करावी लागणार आहे.
झीरो कस्टमर लायबिलीटी कधी?
1. बँकेकडून कॉन्ट्रिब्युटरी फ्रॉड, हलगर्जी किंवा चूक झाली आणि ग्राहकांनी बँकेला सूचना दिली नसली तरी ग्राहकांना फटका बसणार नाही
2. अनऑथराईज्ड बँक व्यवहारांची जबाबदारी ग्राहकांची नसेल, आणि बँकेचीही नसेल, मात्र सिस्टमच्या चुकीमुळे ट्रँझॅक्शन झाले असतील, मात्र ग्राहकांनी चार ते सात दिवसात सूचना दिली, तर ग्राहकांचं 25 हजारांचं नुकसान होईल.
सात दिवसांनंतर बँकेला सूचना दिल्यास बँकेच्या मंडळाच्या नियमांनुसार सेव्हिंग्ज बँक खातेधारकांना जास्तीत जास्त दहा हजार रुपयांपर्यंत नुकसान सहन करावं लागू शकतं.