देश
अटक करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची उदयनराजेंसोबत गळाभेट
ज्या पोलिस अधिकाऱ्यावर राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांना अटक करण्याची जबाबदारी आहे, त्यांनीच उदयनराजेंची गळाभेट घेतल्याचा प्रकार घडला आहे.
खंडणीचा आरोप असलेल्या उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी फेटाळला. त्यानंतर उदयनराजेंनी आज सातारा शहर पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावली.
यावेळी पोलिस स्टेशनचे दाखल होताच पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी उदयनराजेंची गळाभेट घेतली.
दरम्यान, वैद्यकीय तपासणीसाठी उदयनराजेंना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं असून कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.
काय आहे प्रकरण?
लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासोबत तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 9 जणांना अटकही करण्यात आली आहे.
उदयनराजे यांनी याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. पण हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उदयनराजे यांनी हजारो समर्थकांसह साताऱ्यात जोरदार एंट्री केली. यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थक रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं होतं.
दरम्यान, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस खासदार राजीव सातव, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही उदयनराजेंना पाठिंबा दिला आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.