Menu

देश
अमरनाथ यात्रेवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचं सावट

nobanner

जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी पाकिस्तानी लष्कर तोयबाचा कमांडर अबू इस्माईल अमरनाथ यात्रेला पुन्हा एकदा लक्ष्य करू शकतो. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण भागाला सैन्याने घेरलं असून तेथे शोध मोहीम सुरु आहे.

प्रत्येक ठिकाणी दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. अबू इस्माईल तोच दहशतवादी आहे ज्याने अमरनाथवरुन येणाऱ्या प्रवाशांवर हल्ला केला होता. इस्माईल आणि त्याच्या साथिदारांचा शोध सुरु आहे. इस्माईल दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग, कुलगाम आणि आजुबाजुच्या भागात सक्रिय आहे.

इस्माईलसह एकूण पाच दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केला होता. त्यापैकी दोघे लष्करचे पाकिस्तानमधले तर दोघे स्थानिक तरुण होते. या सर्वांनी गोळीबार करून सात भाविकांचे प्राण घेतले होते. सोमवारी रात्री ८.२० मिनिटांनी हा हल्ला झाला होता. यामध्ये अनेक जण जखमी झाले होते.