Menu

देश
गोवा राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक, भाजप-काँग्रेसचे उमेदवार

nobanner

गोव्यातील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजप आघाडीतर्फे भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि काँग्रेसतर्फे विद्यमान राज्यसभा सदस्य तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी आपापले उमेदवारी अर्ज विधानसभा सचिवांकडे सादर केले.

भाजप आघडीने तेंडुलकर यांचे नाव जाहीर केल्यानंतर काँग्रेस हायकमांडने विद्यमान राज्यसभा सदस्य तथा नूतन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचे निश्चित केलं. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजप आघडीकडे २१ सदस्य असल्याने भाजपचे पारडे जड आहे. काँग्रेसकडे १६ सदस्य आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे चर्चिल आलेमाव कोणाच्या पारड्यात मत टाकणार हे स्पष्ट झालेले नाही. भाजप आघडीमध्ये सहभागी पक्ष आणि काही अपक्ष आमदार धर्मनिरपेक्ष तत्व मानत असल्याने ते आपल्याला साथ देतील असा विश्वास काँग्रेस उमेदवार नाईक यांनी व्यक्त केला आहे.