अपराध समाचार
चर्चगेट स्टेशनवर तरुणीचा विनयभंग
- 159 Views
- July 15, 2017
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on चर्चगेट स्टेशनवर तरुणीचा विनयभंग
- Edit
nobanner
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर मुलीचा विनयभंग झाल्याचं समोर आलं आहे. 8 जुलैची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
एक तरुणी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर लोकलची वाट पाहात उभी होती. त्यावेळी आरोपी तरुण आला आणि त्याने जाणीवपूर्वक तरुणीला स्पर्श केला.
मात्र त्या तरुणीने विरोध करत त्याला पकडलं. यानंतर आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी अल्पवयीन असून त्याचं वय 16 वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.
आरोपीवर आरोपपत्रही दाखल करण्यात आलं आहे.
आरोपी तरुणाचं मुंबईत कोणताही रहिवाशी पत्ता नाही. तो कालाघोडा परिसरात बहिणीसोबत रस्त्याच्या कडेला राहतो. हे कुटुंब मूळचं मध्य प्रदेशचं राहणारं आहे.
Share this: