देश
चिपळूण तालुक्यातील अडरेमधील धरणात गणेश चाळके या ३० वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला.
nobanner
आपल्या मित्रांसह गणेश पोहायला गेला होता. मात्र, त्याचे मित्र काहीवेळात घरी जाण्यासाठी निघाले. मात्र, गणेश हा घरी नंतर येतो असं सांगून पाण्यात पोहत राहिला. रात्री, उशिरापर्यंत गणेश घरी का आला नाही म्हणून शोधाशोध सुरू झाली. यानंतर धरणाजवळ त्याचे कपडे सापडले.
घराच्यांनी शोधाशोध सुरू करुन अलोरे शिरगाव पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली तेव्हा धरणाच्या पायथ्याशी गणेश चाळकेचा मृतदेह सापडला.
Share this: