Menu

खेल
तेजस्विनी सावंतचा अखिल भारतीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णवेध

nobanner

महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी सावंतने कुमार सुरेंद्रसिंग चषक अखिल भारतीय नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या ५० मीटर रायफल थ्रीपोझिशनमघ्ये सुवर्णपदक जिंकले.
तेजस्विनीने अंतिम फेरीत ४५४.७ गुणांची कमाई केली. हरयाणाची आदिती सिंग व पंजाबची दिलरीन गिल यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले. बंगालची उदयोन्मुख खेळाडू मेहुली घोषने कनिष्ठ महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सोनेरी कामगिरी केली. तसेच तिने युवा विभागात रौप्यपदक मिळवत दुहेरी कामगिरी केली.

चंदिगढच्या अंजम मुदगिलने महिलांच्या वरिष्ठ विभागात १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तिने २५१.३ गुण मिळवले. मेघना सज्जनारने २४८.२ गुण नोंदवत रौप्यपदक मिळवले. रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या आयोनिका पॉलला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. कनिष्ठ महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये जम्मू व काश्मीरच्या श्रेया सक्सेनाला प्रथम स्थान मिळाले.