देश
‘भाजपच्या कोणत्याही नेत्याने लढावे’
खासदार चंद्रकांत खैरे यांचे औरंगाबाद जिल्ह्यतील नेत्यांना आव्हान
लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्य़ातील भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याने माझ्याविरुद्ध निवडणूक लढवावी, असे जाहीर आव्हान खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा स्वतंत्र उमेदवार उभे करणार असल्याची तयारी सुरू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर खासदार खैरे यांचे हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे भाजपाचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार असू शकतात. ‘त्यांनी किंवा प्रशांत बंब अथवा विजया रहाटकर यांनी उमेदवार म्हणून उभे राहावे’, असे सांगत खैरे म्हणाले, ‘त्यांच्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद मतदारसंघात सक्षम उमेदवारच नाही.’ जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
कन्नड मतदारसंघातून खासदार खैरे यांना सातत्याने आघाडी मिळते. या विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नुकतीच खासदार खैरे यांच्यावर टीका केली होती. या पाश्र्वभूमीवर खैरे यांनी जाधव यांच्या विरोधात निवडणूक लढवून केवळ १ हजार ५६१ मतांनी पराभूत झालेल्या उदयसिंह राजपूत यांना शिवसेनेत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. ‘लवकरच उदयसिंह राजपूत शिवसेनेत दाखल होणार आहेत. केवळ त्यांचा प्रवेशाचा जाहीर कार्यक्रम होणे बाकी आहे’ असे खैरे म्हणाले. केवळ कन्नडच नाही तर अन्य मतदारसंघातीलही काही इच्छुक शिवसेनेत येण्यास उत्सुक आहेत, असा दावा त्यांनी केला.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.