देश
अज्ञातानं भरदिवसा महिलेची वेणी कापली, औरंगाबादमधील घटना
nobanner
मुंबईपाठोपाठ आता वेणी कापण्याचे लोण औरंगाबादमध्ये येऊन पोहोचलं आहे. औरंगाबादमधील छावणी बाजार परिसरात एका महिलेची वेणी अज्ञातानं कापल्याची घटना घडली आहे.
भरदिवसा वेणी कापल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिला आणि तिचा पती काल (शुक्रवार) बाजारात गेले असताना एका अज्ञात व्यक्तीनं महिलेची वेणी कापली. मात्र, घरी आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. दरम्यान, याप्रकरणी छावणी पोलिसांत अज्ञाताविरोधात गन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी मुंबईतल्या भायखळा आणि वडाळामध्येही अशीच घटना घडली होती. यात तीन महिलांच्या वेणी कापण्यात आल्या होत्या. या घटनांमुळे महिलांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे.
Share this: