देश
रात्रीच्या वेळेत मेट्रो 3 चं काम बंद करा, हायकोर्टाचे आदेश
मेट्रो 3 चं काम रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान करण्यास मुंबई हायकोर्टाने बंदी घातली आहे.
रात्रीच्या कामाच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो, त्यामुळे रात्रीच्या वेळेतील काम थांबवावं, अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती.
कफ परेड इथं राहणारे रॉबिन जयसिंगानी यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर, हायकोर्टाने रात्रीच्या वेळी मेट्रोचं काम थांबवण्याचे आदेश दिले.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ असा मेट्रो तीनचा मार्ग आहे. 33.5 किमी अंतराचा हा मार्ग अंडरग्राऊंड अर्थात भुयारी आहे. या मार्गावर वेगाने काम सुरु आहे. मात्र रात्रीच्या वेळी यंत्रांचा आवाज, त्यामुळे होणारा त्रास, यामुळे रॉबिन जयसिंगानी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
जयसिंगानी यांची मागणी ग्राह्य धरत, हायकोर्टाने रात्रीच्या वेळी होणारं काम थांबवण्याचे आदेश दिले.
दरम्यान, यामुळे मेट्रो तीनचं काम पूर्ण होण्यास विलंब होण्याची चिन्हं आहेत.