अपराध समाचार
वेणी कापणारी चेटकीण समजून आग्र्यात वृद्धेची हत्या
- 217 Views
- August 03, 2017
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on वेणी कापणारी चेटकीण समजून आग्र्यात वृद्धेची हत्या
- Edit
देशातील चार राज्यांमध्ये महिलांची वेणी कापणाऱ्या मांजरीची दहशत पसरली आहे. मात्र उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये वेणी कापणारी चेटकीण समजून एका वृद्ध महिलेला मारहाण करण्यात आली. या घटनेत तिचा मृत्यू झाला असून कुटुंबीयांनी मृतदेह पोलिस स्टेशनमध्ये ठेवून गोंधळ घातला.
आग्र्याच्या फतेहाबादच्या मगटई गावातील ही घटना आहे. मान देवी (वय 62 वर्षी) नावाची ही वृद्ध महिला रात्री उशिरा घराबाहेर शौचास गेली होती. मिट्ट अंधार असल्याने ती रस्ता विसरली आणि एका वस्तीजवळ पोहोचली. तेव्हा एका मुलीने तिला पाहून आरडाओरडा सुरु केला. मुलीचा आवाज ऐकून गावकरी तिथे जमा झाले. ही महिला वेणी कापायला आली आहे, असं समजून गावऱ्यांनीही कोणताही विचार न करता तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.
यादरम्यान, काही लोकांनी तिला ओळखलं, पण तेव्ह फार उशिर झाला होता. माहिती मिळताच महिलेचे कुटुंबीय घटनास्थळी जाऊन तिला रुग्णालयात दाखल केलं. पण तिथे महिलेला मृत घोषित केलं.
या घटनेनंतर गावात तणावाचा वातावरण आहे. गावात मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी काही गावकऱ्यांविरोधात गुन्गा दाखल करुन प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
हरियाणाध्ये दहशत
महिलांची वेणी कापण्याच्या भीतीने हरियाणाच्या गुरुग्राममध्ये लोक लाठ्याकाठ्या घेऊन रात्रभर पहारा देत आहेत. एकट्या हरियाणात वेणी कापण्याचे 30 पेक्षा जास्त घटना समोर आल्या आहेत. दिल्लीमध्ये 45 हून अधिक महिलांच्या वेण्या कापल्याच्या घटना घडल्या आहेत.
गुरुग्राममध्ये महिला भीतीपोटी रात्री डोक्यावर कपडे बांधून झोपतात. घाबरु नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.