टेक्नोलॉजी
स्वाईपचा Elite 4G स्मार्टफोन लाँच, किंमत 3,999 रुपये
- 283 Views
- August 17, 2017
- By admin
- in टेक्नोलॉजी, समाचार
- Comments Off on स्वाईपचा Elite 4G स्मार्टफोन लाँच, किंमत 3,999 रुपये
- Edit
स्वाईप टेक्नोलॉजीनं काल (बुधवार) स्वस्त 4G स्मार्टफोन ‘Elite 4G’ लाँच केला. या स्मार्टफोनची किंमत फक्त 3,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध असणार आहे.
Elite 4G स्मार्टफोनमध्ये 5 इंच डिस्प्ले देण्यात आला असून यामध्ये गोरिल्ला ग्लासही देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 1.3 Ghz क्वॉड कोअर प्रोसेसर असणार आहे. यामध्ये 8 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली असून 64 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येईल. हा स्मार्टफोन अँड्रॉईड मार्शमेलो 6.0 वर आधारित असणार आहे.
Elite 4G मध्ये 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 2,500 mAh बॅटरीही देण्यात आली आहे.
स्वाईपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाल गांधी यांनी या स्मार्टफोनबाबत माहिती देताना सांगितलं की, ‘या स्मार्टफोनमध्ये बरेच फीचर आहेत. भारतीय यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊनच हा स्मार्टफोन तयार करण्यात आला आहे.’
हा स्मार्टफोन काळा, सफेद आणि गोल्डन रंगात उपलब्ध आहे.