देश
११.४४ लाख पॅनकार्ड रद्द, तुमचंही झालं नाही ना! असं तपासून पाहा…
केंद्र सरकारने सुमारे ११ लाख ४४ हजार २११ पॅनकार्ड रद्द केली आहेत. नियमानुसार देशातील नागरिक एकच पॅनकार्ड वापरू बनवू शकतो. मात्र, देशात अशा अनेक व्यक्ती आढळून आल्या आहेत, ज्यांच्याकडे एकापेक्षा अधिक पॅनकार्ड आहेत, अशी माहिती वित्त राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी मंगळवारी संसदेत दिली. रद्द झालेल्या पॅनमध्ये तुमचे नाही ना, तुम्ही आधी तपासून पाहा.
२७ जुलैपर्यंत एका व्यक्तीच्या नावे एकाहून अधिक पॅनकार्ड असल्याचे आढळून आले. यांची संख्या ११,४४,२११ एवढी आहे. ही सर्व पॅनकार्ड आता रद्द करण्यात आली आहेत. तसेच २७ जुलैपर्यंत करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान १,५६६ बनावट पॅन कार्डदेखील आढळून आली आहेत, अशी माहिती गंगवार यांनी राज्यसभेत लेखी स्वरुपातील उत्तरात दिली.
पॅनकार्ड वैध आहे ते पाहा?
अनेक पॅनकार्ड रद्द केल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरलेय. त्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकलाय. आपले चुकून पॅनकार्ड रद्द झालेले नाही ना, अशी शंका येऊ लागली आहे. मात्र टेन्शन घेऊ नका. पॅनकार्ड रद्द झाले आहे की नाही? हे असे तपासू शकता.
तुम्ही आयकर विभागाच्या बसाइटला भेट देऊ शकता. http://incometaxindiaefiling.gov.in/ वर लॉग-इन करा. लॉग-इन केल्यानंतर खालील विंडो ओपन होईल.
आयकर विभागाची साइट सुरू झाल्यानंतर डाव्या बाजूकडील Know Your PAN हा पर्याय निवडावा. हा Know Your PAN पर्याय निवडल्यानंतर आणखी एक विंडो ओपन होईल. यात तुम्हाला तुमच्याबाबत सर्व माहिती द्यावी लागेल.
जी माहिती तुमच्या पॅनकार्डवर आहे तिच माहिती ऑनलाइन फॉर्म भरताना तुम्हाला द्यावी लागणार. त्यामुळे फॉर्म काळजीपूर्वक भरावा. उदाहरणार्थ जर आडनाव किंवा मधले नाव नसल्यास तो रकाणा भरण्याची आवश्यकता नाही. याव्यतिरिक्त तुम्हाला मोबाइल नंबर द्यावा लागेल. मोबाइल नंबर दिल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा. ही माहिती सबमिटी केल्यानंतर आणखी एक नवी विंडो ओपन होईल. या विंडोवर मोबाइलवर आलेला OTP क्रमांक टाकावा आणि क्लिक पर्याय निवडावा.
जी माहिती तुमच्या पॅनकार्डवर आहे तिच माहिती ऑनलाइन फॉर्म भरताना तुम्हाला द्यावी लागणार. त्यामुळे फॉर्म काळजीपूर्वक भरावा. उदाहरणार्थ जर आडनाव किंवा मधले नाव नसल्यास तो रकाणा भरण्याची आवश्यकता नाही. याव्यतिरिक्त तुम्हाला मोबाइल नंबर द्यावा लागेल. मोबाइल नंबर दिल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा. ही माहिती सबमिटी केल्यानंतर आणखी एक नवी विंडो ओपन होईल. या विंडोवर मोबाइलवर आलेला OTP क्रमांक टाकावा आणि क्लिक पर्याय निवडावा.
३१ ऑगस्टपर्यंत आधार- पॅन जोडा
सरकारनं करदात्यांना आधार कार्ड पॅन कार्डसोबत जोडण्यासाठी ३१ऑगस्टपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत पॅन कार्ड जोडले नाही तर ते रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत
करदात्यांचा वाढता ओघ पाहता प्रशासनाने ही मुदत ५ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी तुमच्याकडे ५ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. करदात्यांना आयटी रिटर्न भरण्यासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन, मुदतवाढ देण्यात येत आहे, असं प्रशासनाने म्हटलं आहे.२०१६-१७ या आर्थिक वर्षाचं आयटी रिटर्न भरण्यासाठी आता ५ ऑगस्ट २०१७ ही मुदत असेल.
आर्थिक वर्ष २०१६-१७ चे प्राप्तीकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न-आयटीआर) भरण्याचा शेवटचा दिवस ३१ जुलै असून ही मुदत वाढवून दिली जाणार नाही, असे वृत्त आहे.त्यामुळे तुम्ही वेळते रिटन भरा, असे आवाहन करण्यात आलेय.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.