Menu

देश
एलफिन्स्टन स्टेशनवरील चेंगराचेंगरीत १५ ठार

nobanner

एलफिन्स्टन स्टेशनवर चेंगराचेंगरीत ३ जणांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. यातील २० ते २५ जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींना केईएम रूग्णालयात नेण्यात आले होते.

मुंबईत सकाळी आलेल्या जोरदार पावसामुळे ही स्थिती उदभवली असल्याचं सांगण्यात येत आहे. पादचारी पुलावर गर्दी आणि अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.

पावसामुळे अनेक प्रवासी हे प्लॅटफॉर्मवरच अडकले आणि नवीन येणाऱ्या लोकलमधील प्रवाशांमुळे गर्दीत आणखीनच भर पडली. एलफिन्स्टनच्या पादचारी पुलाच्या पायऱ्यांवर गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ३ जणांचा मृत्यू तर २० ते २५ जण जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.