देश
नागरिकांनो, १ ऑक्टोबरपासून या बदलांसाठी तयार राहा…
१ ऑक्टोबरपासून देशभरात अनेक बदल होणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे, या बदलांचा तुमच्या खिशावरदेखील परिणाम दिसून येणार आहे.
वस्तूंवरचा एमआरपी बदलणार
जीएसटी लागू झाल्यानंतर व्यापारी ३० सप्टेंबरपर्यंतच जुन्या सामानावर नवा एमआरपी स्टिकर लावून विकू शकतात. १ ऑक्टोबरपासून बाजारात प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला नवीन एमआरपी दिसेल. यासंबंधी ‘कन्झ्युमर्स मिनिस्ट्री’च्या नोटिफिकेशनची वाट पाहावी लागेल.
मोबाईल कॉल दर कमी होणार
ट्रायनं इंटरकनेक्शन युझेस चार्ज अर्ध्याहून अधिक कमी केलेत. १ ऑक्टोबरपासून हा दर १४ पैसे प्रति मिनिटपासून कमी होऊन ६ पैसे प्रति मिनिट होणार आहे. स्वस्त कॉलदर झाल्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे.
टोल प्लाझावरील रांगेपासून सुटका
१ ऑक्टोबरपासून नॅशनल हायवेपर असलेल्या सर्वच टोल प्लाजावर फास्टॅग असणाऱ्या गाड्या न थांबता ओलांडू शकतील. सर्व टोल प्लाझांवर डेडिकेटेड फास्टॅग लेन तयार होणार झाल्यात.
‘एसबीआय’ची मिनिमम बॅलन्स अट…
एसबीआयनं मेट्रो शहरांत मिनिम बॅलन्सची लिमिट ५००० रुपयांनी कमी करत ३००० रुपये केलीय. याचा जवळपास पाच करोड खातेधारकांना फायदा मिळणार आहे.
एसबीआय अकाऊंट बंद करताना…
ऑक्टोबरपासून कोणत्याही ग्राहकाला आपलं एसबीआय अकाऊंट बंद करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस द्यावे लागणार नाहीत… अट फक्त एकच… त्याचं खातं एक वर्ष जुनं असावं… जर एखाद्या ग्राहकानं बँक अकाऊंट उघडल्याच्या १४ दिवसानंतर आणि एक वर्षापूर्वी आपलं अकाऊंट बंद केलं तर त्याला ५०० रुपये आणि जीसएटी भरावं लागेल.
…तर चेकबुक बदलून घ्या!
ज्या ग्राहकांकडे एसबीआयमध्ये मर्ज झालेल्या बँकांचं चेकबुक आहे त्यांना आपलं चेकबुक बदलावंम लागेल. या बँकांचे जुने चेकबुक आणि IFSC कोड ३० सप्टेंबरनंतर अवैध ठरेल.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.