देश
‘लालबागचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
गेले १२ दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपतीला निरोप देण्यासाठी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांसह अन्य विसर्जनस्थळांवर होणारी भाविकांची अलोट गर्दी लक्षात घेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिका सज्ज झाली आहे. गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना सेवा-सुविधा मिळाव्या यासाठी विसर्जनस्थळांवर तब्बल ८,६०४ पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला असून गणेश विसर्जनाच्या निमित्ताने भाविकांनी समुद्रात उतरू नये यासाठी ५० जर्मन तराफे सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तब्बल ६०७ जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. दुसरीकडे, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली असून सुमारे ३६०० पोलीस अधिकारी व कर्मचारी, ५०० वाहतूक वॉर्डन आदी सुरक्षा व्यवस्थेसाठी मुंबईभरात तैनात केले आहेत. संपूर्ण मुंबईत ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त गर्दीच्या ठिकाणी देखरेख करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.
गिरगाव, दादर, जुहू आदी विविध ठिकाणचे समुद्रकिनारे, तलाव आणि कृत्रिम तलाव आदी १०१ विसर्जनस्थळांवर गणेश विसर्जनासाठी येणारे भाविक आणि हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिकाही सज्ज झाली आहे. गिरगाव, दादर, जुहू या समुद्रकिनाऱ्यांसह ६९ नैसर्गिक विसर्जनस्थळे आणि पालिकेच्या ३२ कृत्रिम तलावांवर भाविकांची अलोट गर्दी होते. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने १०१ विसर्जनस्थळांवर ७४ प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्था केली असून तब्बल ६० रुग्णवाहिका सज्ज ठेवल्या आहेत. गणरायाला निरोप देण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी तब्बल ८७ स्वागत कक्ष, गणेशमूर्तीसोबत विसर्जनस्थळांवर घेऊन येणाऱ्या निर्माल्यांसाठी २०१ निर्माल्य कलश, निर्माल्य वाहून नेण्यासाठी १९२ डम्पर, ११८ तात्पुरती शौचालये आदी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विसर्जनस्थळांवर रात्री लख्ख उजेड असावा यासाठी तब्बल १९९१ फ्लडलाईट आणि १३०६ सर्चलाईटचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशमूर्तीची ट्रॉली अडकू नये म्हणून समुद्रकिनाऱ्यांवर वाळूमध्ये ८४० स्टील प्लेट टाकण्यात आल्या आहेत.
‘लालबागचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीत भक्तांचा जल्लोष
‘लालबागचा राजा’ थाटात मार्गस्थ
‘लालबागचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
‘गिरगावचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात
लालबागच्या राजाच्या निरोपाची तयारी
मुंबई महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात घरगुती गणपतींचे विसर्जन करताना भाविक.
‘लालबागचा राजा’ची विसर्जन मिरवणूक थोड्याच वेळात…
मुंबईतील पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ केशवजी नाईक चाळीच्या गणपतीला सचिन तेंडुलकरचा भाऊ अजित तेंडुलकर याने भेट दिली.
* मिरवणुकीदरम्यान गणेश गल्लीच्या राजावर पुष्पवृष्टी
* परळचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ; मिरवणुकीला सुरुवात
* कोल्हापूरमध्ये गणेश विसर्जन सुरू, पाहिली मूर्ती पंचगंगा घाटावर पोहचली
* गणेश गल्लीचा राजा मंडपातून मार्गस्थ; मिरवणूक सोहळ्याला सुरुवात
* थोड्याचवेळात मुंबईतील मानाचा गणपती असलेल्या गणेश गल्लीच्या राजाच्या मिरवणूक सोहळ्याला सुरुवात
* वाहतूक पोलिसांचे ३ हजार ५०० अधिकारी-कर्मचारी सज्ज आहेत, त्याचबरोबर ५०० ट्रॅफिक वॉर्डन तयार
* मुंबईत शंभर ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय
* बाप्पाच्या विसर्जनासाठी मध्य रेल्वेच्या आज विशेष फेऱ्या.