Menu

देश
सांगलीच्या जवानाचं डोकलाममध्ये अपघाती निधन

nobanner

जत तालुक्यातील निगडी खुर्द येथील जवान अजित नारायण काशिद (वय 24) यांचा भारत-चीन सीमेवर डोकलाम येथे सेवा बजावत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. अपघातामध्ये जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

सेवा बजावत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला असल्याने त्यांना मंगळवारी शहीद घोषित करण्यात आलं. बुधवारी सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जिल्हा सैनिक विभागाकडून याची माहिती मिळताच जत तालुका प्रशासनाकडून अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली.

काशिद यांना शहीद घोषित केल्याचा संदेश पाठवण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी शासकीय इतमामात त्यांच्या मूळ गावी निगडी खुर्द येथे अत्यसंस्कार करण्यात येतील. तशी तयारी निगडी येथे करण्यात आली आहे.

शहीद जवान अजित काशिद यांच्या मुत्यूमुळे संपुर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. शासकीय यंत्रणांनी अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण केली आहे. अजित काशिद अविवाहित होते. त्याच्या पश्र्चात आई वडील, विवाहित बहिण, भाऊ असा परिवार आहे.