Menu

दुनिया
डोळ्यात टॅटू बनवण्याच्या नादात मॉडेलने गमवली दृष्टी

nobanner

कॅट कलिंगर या कॅनेडियन मॉडेलला डोळ्यात टॅटू बनवणं महागात पडलं आहे.

डोळ्याच्या पांढर्‍या भागावर टॅटू बनवताना झालेल्या एका चूकीमुळे या मॉडेलची दृष्टी गेली आहे. एका डोळ्याची तिची पूर्ण दृष्टी गेल्याने अंधत्त्व आले आहे.

कॅट कलिंगरने तिचा अनुभव फेसबुकवर लिहला आहे. २४ वर्षीय कॅटच्या डोळ्यांतून जांभळ्या रंगाचं पाणी वाहत आहे. तसेच तिच्या डोळ्यांमध्ये प्रचंड वेदना होत आहेत. जांभळ्या रंगांचं पाणी थांबवण्यासाठी जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा तिला अ‍ॅन्टिबायोटिक्स ड्रॉप्स देण्यात आले आले. मात्र या ड्रॉप्सचा साईडइफेक्ट झाल्याने तिच्या डोळ्याला सूज आली.