देश
‘या’ पदार्थाच्या अतिसेवनामुळे कॅन्सरचा ट्युमर जलद गतीने वाढतो!
nobanner
कॅन्सरविषयी ९ वर्ष चालत आलेल्या एका संशोधनात असे दिसून आले की, साखरेचे सेवन कॅन्सरच्या पेशी वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे ट्युमर वाढण्याच्या गतीत वाढ होते. हे संशोधन कॅन्सरच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे समजले जाते.
बेल्जियममधील वलाम्स इन्स्टिटयूटवर बॉयोटेक्नोलॉजी (वीआईबी), कथोलिएके युनिव्हर्सिटी लियूवेन (केयू लियूवेन) आणि व्रिजे युनिव्हर्सिटी ब्रसेल (वीयूबी) यांनी देखील या संशोधनाला दुजोरा दिलेला आहे.
या संशोधनातून साखर आणि कॅन्सर यांचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. आहारात साखरेचा अधिक समावेश असल्यास त्याचा कॅन्सर रुग्णांवर खूप प्रभाव होऊ शकतो. वीआईबी-केयू लियूवेनच्या जोहान थिवेलिन यांनी सांगितले की, “आमच्या संशोधनातून असा खुलासा झाला आहे की साखरेच्या अति सेवनामुळे कॅन्सरच्या पेशी वाढण्याची गती वाढते.”
Share this: