Menu

खेल
पदार्पणाच्या कसोटीतच दिसला होता सेहवागचा जलवा!

nobanner

दिल्ली क्रिकेट असोसिएशनने नुकतेच फिरोजशहा कोटला मैदानाच्या एका प्रवेशद्वाराला वीरेंद्र सेहवागचं नाव दिलं. यावेळी प्रवेशद्वारावर सेहवागच्या कारकिर्दीतील महत्वाच्या क्षणांची माहिती देणारा एक फलक लावण्यात आला होता. यावर सेहवाग भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा एकमेव खेळाडू असल्याचा उल्लेख केल्यामुळे चांगलेच वादंग उठल्याचे पाहायला मिळाले. सेहवाग हा त्रिशतकी खेळी करणारा पहिला फलंदाज आहे. त्याच्यानंतर करुण नायरने भारताकडून त्रिशतक झळकावले आहे.

याशिवाय क्रिकेटच्या मैदानात भारताकडून पदार्पणात शतक करण्याचा पराक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावे आहे. ३ नोव्हेंबर २००१ मध्ये सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली होती. विशेष म्हणजे भारताचा सलामीवीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीरेंद्र सेहवागने सहाव्या क्रमांकावर येऊन हे शतक झळकावले होते. या सामन्यात त्याने २७२ चेंडूत १९ चौकारांच्या मदतीने १०५ धावांची खेळी केली होती. पदार्पणातील शतकाशिवाय सचिन तेंडुलकरसोबत त्याने पाचव्या गड्यासाठी २२० धावांची भागीदारी केली. या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र सेहवागच्या रुपात एक स्फोटक फलंदाज मिळाला होता.