देश
प्रगती एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
nobanner
मध्य रेल्वेच्या मुलुंड आणि ठाणे या स्थानकांदरम्यान गुरूवारी संध्याकाळी तांत्रिक बिघाड उद्भवल्यामुळे प्रगती एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या इंजिनात तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे आता प्रगती एक्स्प्रेस एकाच जागी थांबून आहे. एक्स्प्रेसच्या इंजिनाची दुरूस्ती लगेच करणे शक्य नाही. त्यामुळे प्रगती एक्स्प्रेसला नवे इंजिनच जोडावे लागणार आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या खोळंब्यामुळे सध्या डाऊन दिशेच्या जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
Share this: