Menu

अपराध समाचार
उत्तर प्रदेशमध्ये स्थानिकांकडून फ्रेंच नागरिकांना बेदम मारहाण

nobanner

उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर येथे पुन्हा एकदा स्थानिक युवकांनी विदेशी पर्यटकांची छेड काढून त्यांना मारहाण केल्याची घटना घडली. सर्व पर्यटक हे फ्रान्सचे असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे. घटनेनंतर सर्व जखमी पर्यटकांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून याप्रकरणी १२ लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे तर चार जणांना अटक करण्यात आली.
फ्रान्सच्या पर्यटकांची भारतीय मैत्रीण रिया दत्तने दिलेल्या माहितीनुसार, सुरूवातीला काही स्थानिक युवकांनी पर्यटकांना शिवीगाळ केली, त्यांची छेड काढत मारहाणही केली. जेव्हा मी त्यांना रोखण्यासाठी गेले तर त्यांनी मलाही मारण्यास सुरूवात केली. नंतर त्या लोकांनी आणखी काही लोकांना आम्हाला मारण्यास बोलावले. बचावासाठी आम्हीही त्यांना मारहाण केली.
जखमी पर्यटकांपैकी एकाने म्हटले की, आम्ही सर्वजण परतत होतो. अचानक काही लोक आले आणि त्यांनी आम्हाला शिव्या देण्यास सुरूवात केली. त्यानंतर ते लोक आम्हाला लाकडाने मारू लागले. यामध्ये माझा एक मित्र गंभीर जखमी झाला.
काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यात रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीने जर्मन नागरिकाला मारहाण केली होती. तर २६ ऑक्टोबरला फतेहपूर सिक्री येथे स्वीत्झर्लंडच्या एका दाम्पत्यालाही स्थानिक नागरिकाकडून बेदम मारहाण करण्यात आली होती.