Menu

देश
जवानांची बलिदाने ‘चुनावी जुमले’ ठरू नयेत, सेनेचा मोदींना टोला

nobanner

भाजप व केंद्र सरकारवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह तीन जवान हुतात्मा झाले. हाच मुद्दा पुढे करत सेनेने केंद्र सरकारला फटकारले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पाकिस्तानच्या मदतीने सत्तांतर करत असल्याचा दावा करत भाजपने निवडणुकीत हा मुद्दा तापवला होता. आता निवडणूक झाली पाकच्या हस्तक्षेपाचे काय झाले, की हा ‘चुनावी जुमला’ होता असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काश्मीरात पाकिस्तानच्या गोळीबारात वाढ झाली आहे. आपले जवान तिथे हुतात्मा होत आहेत. पण देशाची संरक्षण यंत्रणा सत्तेचे इमले व निवडणुकांचे जुमले यातच गुरफटलेली आहे, अशावेळी देशाला वाचवायचे कोणी, असा सवाल करत जवानांची बलिदाने हे जुमले ठरू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सीमेवर पाकिस्तानने उच्छाद सुरू केला आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात तीन जवान हुतात्मा झाले. आमच्या तीन जवानांच्या बदल्यात पाकिस्तानची किती मुंडकी उडवली, असा सवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ या सेनेच्या मुखपत्रातून उपस्थित केला.

सर्वाधिक रक्त भारताच्या भूमीत सांडत आहे. अशावेळी ठोस कृती करून आणि त्याहीपेक्षा पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे. सीतारमण या करारी संरक्षण मंत्री असतीलही किंवा महिला संरक्षण मंत्री नेमल्याने पाक, चीन, नेपाळ, बांगलादेशसारख्या राष्ट्रांनी अचंबित होऊन तोंडात बोटेही घातली असतील, पण त्यांची बोटे तोंडात असली तरी दुसऱ्या हाताची बोटे बंदुकांचे खटके रोज दाबीत आहेत. आम्ही मात्र स्वतःच्याच विजयात दंग आहोत. गुजरातच्या निवडणुकीत पंतप्रधानांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला. पाकिस्तानच्या नावाने गुजरातच्या प्रचारसभा दणाणून सोडल्या. पण आता कृती करण्याची वेळ आलीय, असा सल्ला सेनेने दिला.

एकीकडे चारा घोटाळा, कोळसा घोटाळय़ातील दोषींना शिक्षा होते. तर दुसरीकडे भाजपनेच दणाणून सोडलेल्या दीड लाख कोटींच्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळय़ांतून मात्र द्रमुक नेत्यांसह सर्वजण निर्दोष सुटतात, हे कोडे कसे सोडवायचे, असा उपरोधिक टोलाही सेनेने लगावला. सेनेच्या या आरोपांवर आता भाजपकडून काय प्रत्युत्तर हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.