Menu

अपराध समाचार
बांगलादेशहून फसवलेल्या तरुणींचा वेश्या व्यवसायासाठी वापर

nobanner

बांग्लादेश म्हणजे भारताचा अगदी शेजारी देश… सध्या याच बांग्लादेशमधून भारतात वेश्या व्यवसाय करण्यासाठी अल्पवयीन मुलींची सर्रास तस्करी केली जात आहे. सलमा नावाच्या एका तरुणीनं नाशकात आपली कहाणी सांगितली आहे.

बांग्लादेशमधील दलाल बेधडक 14-15 वर्षांच्या मुलींना नोकरीच्या बहाण्याने भारतात आणून वेश्या व्यवसायात ढकलत आहेत.
या बातमीचा ‘एबीपी माझा’ने पुराव्यासकट पर्दाफाश केला आहे. सलमाने तिचा नाशिकच्या सिन्नरच्या वेश्यावस्तीपर्यंतचा भीषण प्रवास सांगितला.

अल्पवयीन मुलींना हेरुन त्यांना बेकायदेशीररित्या सीमेवरुन भारतात कसं आणलं जातं. रेड लाईट परिसरात त्यांची ने-आण कशी केली जाते…? वेश्या व्यवसाय करण्यास नकार दिला, तर बांग्लादेशातले दलाल कसे या मुलींच्या कुटुंबीयांना मारहाण करतात..? याची माहिती स्वतः बांग्लादेशहून वेश्या व्यवसायासाठी भारतात पाठवलेल्या सलमाने दिली आहे.