देश
वर्ध्यात इन्स्टाग्राम पोस्टवरुन मित्राची हत्या
इन्स्टाग्राम पोस्टवरुन वर्ध्यात १८ वर्षांच्या विद्यार्थ्याने मित्राचीच हत्या केल्याची धक्कादायक घटनाा घडली. समीर मेटांगळे असे या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी विभव गुप्ता (१८) याला अटक केली आहे.
वर्ध्यातील महाविद्यालयात शिकणाऱ्या समीर मेटांगळे या तरुणाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती. ‘आजकल के लौंडे हमे पढाने चले’ अशी ही पोस्ट होती. ही पोस्ट समीरने आपल्याला उद्देशून टाकल्याचा विभवचा समज झाला. शुक्रवारी विभव समीरला जाब विचारायला गेला. तिथे विभवने चाकूने समीरला भोसकले. यात समीरचा मृत्यू झाला. तर भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या समीरचे तीन मित्रही या हल्ल्यात जखमी झाले. समीर आणि विभव या दोघांची ओळख क्लासमध्येच झाली होती. हल्ल्यानंतर विभवने स्वतःवरही वार करुन घेतले होते. या घटनेने वर्ध्यात खळबळ माजली आहे.