Menu

देश
हिंगोलीत आंदोलन, बसची तोडफोड

nobanner

सातव यांना गुजरातमध्ये झालेली मारहाण
हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांना गुजरात पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. कळमनुरीत आमदार संतोष टारफे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या पुतळ्याचे दहन केले. औंढा नागनाथ येथे बसची तोडफोड करून पंतप्रधान मोदी यांच्या पुतळ्याचे दहन केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी औंढानागनाथ येथे भाजप कार्यालयात तोडफोड केली. उशिरापर्यंत कोणत्याही घटनेत गुन्हे दाखल झाले नव्हते.
गुजरात निवडणूक प्रचारानिमित्त खासदार सातव ठाण मांडून आहेत. शनिवारी गुजरातचे मुख्यमंत्री रूपाणी यांच्या राजकोट मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार इंद्रनील राजगुरू यांचे बंधू दिपू राजगुरू यास पोलिसांनी मारहाण केल्यानंतर खुद्द आमदार इंद्रलीन राजगुरू पोलीस ठाण्यात माहिती घेण्यासाठी पोहोचले. आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, काँग्रेस कार्यकत्रे व पोलिसात बाचाबाची झाल्याने पोलिसांनी आमदार राजगुरूसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक केली होती.याची माहिती घेण्यासाठी हिंगोलीचे खासदार सातव पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी त्यांना मारहाण करून ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांची जामिनीवर सुटका झाली. या घटनेचे हिंगोली जिल्ह्णाात तीव्र पडसाद उमटले. औंढा नागनाथ येथे रविवारी स. १० वा. काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिवहन मंडळाच्या बसवर (४० एन. ८४५७) दगडफेक करून काचा फोडल्या. औंढानागनाथ येथे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी नंतर भाजप कार्यालयावर हल्ला करून त्या ठिकाणी साहित्याची तोडफोड केली. मारहाणीच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन केले.

हिंगोली येथे माजी जि. प. सदस्य शामराव जगताप, डॉ. रवि कावरखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून महात्मा गांधी पुतळा चौकात दंडाला काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. या वेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाविरुद्ध घोषणाबाजी केली.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.