Menu

देश
हीच तत्परता पालिकेनं वेळीच दाखवली असती तर’

nobanner

कमला मिलमधील दोन पबमधील अग्नितांडवात १४ जणांचे बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आलीय. कमला मिल आणि रघुवंशी मिलमधील अनधिकृत पब, रेस्टॉरो आणि हॉटेल्सवर पालिकेची कारवाई सुरु आहे. सकाळपासूनच या मिल परिसरातल्या अनधिकृत हॉटेल्स, पब, रेस्टॉरोवर बुलडोजर फिरवण्यात येतोय.

पण, हीच तत्परता पालिकेने आधी का दाखवली नाही? अग्निकांडांसारख्या घटना घडल्यावरच पालिकेला जाग का येते? असा संतप्त सवाल मुंबईकर विचारत आहेत.