Menu

देश
कुठे 2400 तर कुठे 1500 रुपये तिकीट, विरोध झुगारुन ‘पद्मावत’ला गर्दी

nobanner

‘पद्मावत’ सिनेमा तुम्ही पाहायचा प्लॅन तर केलाच असेल. पण हा सिनेमा तुम्हाला पाहायचा असेल तर खिसा रिकामा करावा लागणार आहे. कारण ‘पद्मावत’चं एक तिकीट हजाराच्या वर आहे. त्यामुळे जर कुटुंब किंवा मित्रपरिवारासोबत जाणार असाल तर चांगलाच खड्डा पडणार आहे.

मुंबई, नाशिक, पुणे, नागपूरसह सर्वच शहरात तिकीट हजाराच्या वर आहे. ठाण्यात तर 1 हजार 800 पर्यंत तिकीटाचे दर आहेत. इतकं असूनही ऑनलाईन तिकीटाची विक्री वाढली आहे. विशेष म्हणजे सगळी तिकीटांची विक्री झाली असून थिएटर्स हाऊसफुल्ल आहेत.

रिव्ह्यू: भव्य, रेखीव, नेत्रदीपक – पद्मावत

देशभरातील थिएटरमधील ‘पद्मावत’चे दर

मुंबई – पीव्हीआर वर्सोवा – 1030 रुपये

मुंबई – आयनॉक्स नरिमन पॉईंट – 1550 रुपये

मुंबई – आयनॉक्स वरळी – 1550 रुपये

ठाणे – सिनोपोलिस व्हिव्हियाना मॉल – 1000 रुपये

पुणे – आयनॉक्स बंड गार्डन – 780 रुपये

नाशिक – सिनेमॅक्स सिटी सेंटर मॉल – 530 रुपये

दिल्ली – डायरेक्टर्स कट अॅम्बियन्स – 2400 रुपये

बंगळुरु – पीव्हीआर सेंट्रल स्पिरीट मॉल – 580 रुपये

हैदराबाद – बीव्हीके मल्टिप्लेक्स – 230 रुपये

या’ चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ प्रदर्शित करणार नाही : मल्टिप्लेक्स असोसिएशन

चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’चं प्रदर्शन नाही

दरम्यान, बहुचर्चित ‘पद्मावत’ अखेर आज प्रदर्शित होत आहे. मात्र करणी सेनेच्या विरोधामुळे राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशभरात मल्टिप्लेक्स असोसिएशनच्या सुमारे 1800 ते 2 हजार स्क्रीन आहेत. त्यामुळे चार राज्यातील प्रदर्शन बंद राहिल्यास ‘पद्मावती’ सिनेमाला फटका बसण्याची शक्यता आहे.