Menu

देश
नववर्षांचे जल्लोषात स्वागत..

nobanner

फेसाळते प्याले , डिजेच्या तालावर थिरकणारी पावले आणि जल्लोषात धुंद झालेली तरूणाई . ३१ डिसेंबरच्याय रात्री रायगडात सर्वत्र असेच वातावरण होते. जिल्ह्यात नववर्षांचे स्वागत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आले. पर्यटक आणि स्थानिक नागरीकांनी रायगडचे प्रमुख समुद्रकिनारे अक्षरश फुलून गेले होते.

मुंबईपासून जवळ असलेल्या रायगडच्या किनार्यालना अलीकडे पर्यटकांची पसंती वाढली आहे. त्यामुळे नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी हजारो पर्यटक रायगड जिल्ह्यातील अलिबागसह नागाव, किहीम, काशिद , मुरूड, दिवेआगर, हरिहरेश्वोर , श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर दाखल झाले होते. २०१७ च्याआ शेवटच्याह मावळत्याल सुर्याला निरोप देण्यासाठी सायंकाळी पर्यटकांनी गर्दी केली होती . रात्री ठिकठिकाणी पर्यटकांच्या पाट्र्या सुरू होत्या. अनेक हॉटेल्समध्ये डिजेची व्यवस्था करण्यात आली होती. डिजेच्या तालावर थिरकत पर्यटकांनी थर्टीफर्स्टचा आनंद लुटला. रात्री पार्टी आटोपल्यानंतर सर्वजण किनार्याफवर दाखल झाले.फटाक्यांची आतषबाजी करीत आणि एकमेकांना शुभेच्छा देत सर्वानी नवीन वर्षांचे स्वागत केले.

अलिबागच्या किनार्योवर यंदा पॅराशूटचे आकर्षण होते. किनारा माणसांनी अक्षरश फुलून गेला होता. अनेक पर्यटकांनी पॅराशूट आणि कंदील आकाशात सोडून सरत्या वर्षांला निरोप देत नववर्षांचे स्वागत केले. किनारपट्टी बरोबरच कर्जत खालापूर तालुक्यातील अनेक फार्महाऊसेस हाऊसफुल्ल झाली होती. तेथेही मुंबई , पुणेकर मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबांसह , मित्रमत्रिणींसह दाखल झाले होते. नववर्ष स्वाआगताचा हा माहोल रविवारी दिवसभरदेखील सुरू होता .जल्लोषाच्या उत्साहाला गालबोट लागू नये यासाठी ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. समुद्रकिनारी झालेली पर्यटकांची गर्दी लक्षात घेवून अलिबाग शहरात वाहतूक व्यवस्थे त बदल करण्या्त आला होता.

पर्यटकांची जलवाहतुकीला पंसती

रस्त्याची दुरावस्था आणि वाहतुक कोंडी टाळण्यासाठी पर्यटकांनी जलवाहतुकीला पसंती दिली, दोन दिवसात जवळपास ९० हजार पर्यटक जलवाहतुकीने मांडवा बंदरात दाखल झाले. प्रवासी जलवाहतुकीचा हा उच्चांक होता. खाजगी तसेच सार्वजनिक बोटी दिवसभर सुरु ठेवण्यात आल्या होत्या. मांडवा बंदरावर वयोवृध्द, अपंग आणि आजारी प्रवाश्यांच्या सोयीसाठी गोल्फकार्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला असल्याचे माडंव्याचे बंदर निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगीतले. गेट वे ऑफ इंडीयावर पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन दुपारनंतर जलवाहतुक बंद करण्यात आली.

अवजड वाहतुक रोखल्याने वाहन चालकांना दिलासा

मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतुक दिवसा रोखल्याने अलिबाग, मुरुड, श्रीवर्धनकडे येणारया प्रवाश्यांना तसेच वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला. अवजड वाहतुक बंद असल्याने वडखळ, माणगाव, कोलाड, पेण या ठिकाणी फारशी वाहतुक कोंडी झाली नाही. वाहतुक नियंत्रणासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला होता. रोड सेफ्टी पेट्रोलच्या स्काऊस्टचीही मदत घेण्यात आली होती.