अपराध समाचार
भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू
- 219 Views
- January 08, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू
- Edit
पुण्यातील हिंजवडी जवळ टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा दूर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज (८ जानेवारी २०१८) हिंजवडी येथील माणगावजवळ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मंगेश कणसे (२५) आणि संभाजी गराळे (२५) अशी या अपघातात मरण पावलेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघे एकाच कंपनीत काम करत होते. कामावर जातानाच पहाटेच्या सुमारास त्यांना मृत्यूने गाठले.
या अपघाताबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा सातारा येथील लिंबाचीवाडी येथील असणारा मंगेश आणि संभाजी हे दोघे पिरंगुट येथील एका कंपनीत कामाला होते. पहाटेच्या सुमारास हे दोघे माणगावाहून पिरंगुटकडे दुचाकीवरून (एम एच-११ बी आर ९७१८) जात होते. त्यावेळी भरधाव वेगात असणाऱ्या टेम्पोने (एम एच-१४ सी डब्लू २९८४) मंगेश आणि संभाजी प्रवास करत असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो चालक फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. याप्रकरणी अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी औंध रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.