Menu

देश
महाराष्ट्र बंद मागे, प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

nobanner

पुण्यातील भीमा कोरेगाव पडसादानंतर आज महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली होती. दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद मागे घेतल्याची घोषणा केली.

‘हिंदू संघटनाना धरले जबाबदार’
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र बंद मागे घेत आहोत. मात्र, काही हिंदू संघटना अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोप यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला.

कारवाई केली नाही तर…
सरकारने यापुढे कारवाई केली नाही तर दलित संघटना स्वस्थ बसणार नाहीत. राज्यात यापुढे शांतता ठेवायची आहे की नाही, हे मुख्यमंत्री यांच्या हातात आहे. कारण सर्व संघटना काही माझ्याशी संबंधित नाही. त्या संघटना माझे ऐकतील याची शाशवती मी देऊ शकत नाही, असा थेट इशारा प्रकार आंबेडकर यांनी दिला.

पत्रकार परिषदेतील ठळक बाबी
– काही हिंदू संघटना केवळ अराजक माजवण्यासाठीच अस्तित्वात

– जे न्याय याकूब मेमनला तोच संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना लावावा

– आमच्याच संपाचा आम्हाला फटका बसला, अनेक लोकं या ठिकाणी पोहचले नाहीत.

– आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल जनतेचे आभार

– ‘महाराष्ट्र बंद’ मागे घेत असल्याची घोषणा

– ‘महाराष्ट्र बंद’च्या प्रतिसादानंतर प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद…

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.