Menu

देश
‘त्या’ मोबदल्यात लाच मिळाली, पीएनबीच्या माजी व्यवस्थापकाची कबुली

nobanner

‘एलओयू अर्थात लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्याच्या मोबदल्यात मोठी लाच मिळत होती’, अशी कबुली पीएनबी बँकेचा माजी व्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टीनं दिली आहे. काल (रविवार) याप्रकरणी शेट्टीसह मनोज खरात आणि हेमंत भट या तिघांना सीबीआयनं अटक केली होती. त्यानंतर सीबीआयच्या चौकशीत गोकुळनाथ शेट्टीनं ही कबुली दिली.

गोकुळनाथ शेट्टी यांच्या कार्यकाळातच नीरव मोदी यांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्यात आली होती. विशेष म्हणजे या आरोपींमध्ये मनोज खरात हा एकमेव मराठी चेहरा असून तो अहमदनगरच्या कर्जतचा रहिवाशी आहे.

मनोज खरात बँकेत सिंगल विंडो ऑपरेटर पदावर कार्यरत होता. सीबीआय न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक मानल्या जात असलेल्या घोटाळ्यात पंजाब नॅशनल बँक अडकली आहे. एक हजार 771 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 11 हजार 360 कोटींचा हा घोटाळा असल्याचं समोर आलं आहे. एलओयू म्हणजेच लेटर ऑफ अंडरटेकिंगचा गैरवापर करुन हा घोटाळा केल्याची प्राथमिक माहिती आहे.

पीएनबी ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची पब्लिक सेक्टर बँक आहे. या बँकेच्या मुंबईतील ब्रिच कँडी शाखेत उघडकीस आलेल्या या घोटाळ्याची पाळंमुळं सात वर्ष जुनी असल्याचा अंदाज आहे. अॅक्सिस आणि अलाहाबाद बँकेच्या परदेशी शाखांचीही या घोटाळ्यात फसगत झाल्याचं समोर आलं आहे.

डायमंड किंग नीरव मोदी आणि गीतांजली जेम्स या दोन ग्रुप्सच्या नावाने पंजाब नॅशनल बँकेने लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) दिल्याचा आरोप आहे. गीतांजली जेम्स – जिली इंडिया आणि नक्षत्र, तसंच नीरव मोदी ग्रुप फर्म्स यांच्या वतीने एलओयू (LoU) किंवा एफएलसी (FLC- फॉरेन लेटर ऑफ क्रेडिट) च्या आधारे अॅक्सिस आणि अलाहाबाद बँकेकडून कर्ज देण्यात आलं.

हाँगकाँग, दुबई, न्यू यॉर्कमध्ये नीरव मोदीची परदेशी केंद्रं आहेत. एलओयू दाखवून 2010 पासून नीरव मोदी क्रेडिटवर खरेदी करत असल्याचा संशय आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.