देश
शिवजयंती मिरवणुकीत युवकाचा हृदयविकाराने मृत्यू
nobanner
शिवजयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री भोसे (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथे घडली. अनिल उत्तम ताटे असे मृत युवकाचे नाव आहे.
भोसे येथे शिवजयंतीनिमित्त सांयकाळी शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत मोठ्याप्रमाणात युवक सामील झाले होते. मिरवणूक अंतिम टप्प्यात आली असतानाच अनिल ताटे याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो तिथेच बेशुद्धावस्थेत पडला. ग्रामस्थांनी त्याला त्वरीत मंगळवेढा येथील रूग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Share this: