देश
whatsapp मेसेज १ तासानंतरही होणार डीलीट
nobanner
व्हॉट्सअॅपनं (whatsapp) बीटा यूजर्ससाठी आणखी एक अपडेट जारी केलं आहे. व्हॉट्सअॅपचं २.१८.६९ व्हर्जन वापरकर्त्याना आता व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज ६८ मिनिटांनंतरही डीलीट करता येऊ शकतो.
व्हॉट्सअॅपनं अलिकडेच ‘डीलीट फॉर एव्हरीवन’ हे फीचर आणलं होतं. याआधी ‘डीलीट फॉर एव्हरीवन’साठी ७ मिनिटे देण्यात आली होती. मात्र, आता वेळेत वाढ करण्यात आली असून ६८ मिनिटांनंतरही पाठवलेला मेसेज डीलीट करता येणार आहे. या अपडेटची माहिती व्हॉट्सअॅप ट्रॅकर WABetaInfo नं ब्लॉगद्वारे दिली आहे. हे नवीन अपडेट फक्त अँड्रॉइडच्या बीटा यूजर्ससाठी उपलब्ध आहे. ‘आयओएस’ यूजर्सना अद्याप ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळं त्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.
Share this: