Menu

खेल
भारताची ६६ पदकांची कमाई; एकूण पदकांच्या यादीत तिसऱ्या स्थानी

nobanner

गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा २०१८ मध्ये भारताने चांगली कामगिरी नोंदवली. भारताने या खेळांमध्ये २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्य पदाकांसह एकूण ६६ पदकांची कमाई केली. २०१४ मध्ये ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकलेल्या ६४ पदकांच्या तुलनेत यंदाची भारतीय खेळाडूंची कामगिरी अव्वल ठरली. गोल्ड कोस्टमध्ये भारत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये एकूण १०१ पदकांची कमाई केली होती. तर २००२मध्ये मँचेस्टर येथील स्पर्धेमध्ये ६९ पदके मिळवली होती.