देश
यंदा मुंंबईत म्हाडाकडून 1001 घरांसाठी सोडत
nobanner
दरवर्षी म्हाडाच्या घरांसाठी अनेकजण आपलं नशीब आजमावतात. मुंबईकरांनाही प्रतिक्षा असलेल्या या म्हाडाच्या घराच्या लॉटरीची तारीख ठरलेली नसली तरीही यंदा सुमारे एक हजार घरांसाठी लॉटरी निघेल असे सांगण्यात आले आहे.
अनेक प्रकारात घरं उपलब्ध
यंदा म्हाडा घरांच्या लॉटरीमध्ये सुमारे 500 घरं ही अल्प उत्पन्न गटासाठी राखून ठेवली जाणार आहेत. यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी २८३ आणि अल्प उत्पन्न गटासाठी ५०० घरे राखून ठेवल्याने सर्वसामन्यांचे म्हाडा घरांसाठीचे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता वाढणार आहे.
खर्चावर कपात होणार
म्हाडा लॉटरीसाठी यंदा मुख्यालयात मंडप उभारून लॉटरी जाहीर केली जाईल सोबतच या सोहळ्याचे फेसबुक लाईव्हदेखील होणार आहे. फेसबुक लाईव्हवर म्हाडाची लॉटरी लाईव्ह होत असल्याने गर्दी आटोक्यात राहण्याची शक्यता आहे.
Share this: