खेल
क्रिकेटशिवाय या ८ खेळांमध्ये होता डीव्हीलियर्सचा दरारा
जागतिक क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक असलेल्या एबी डीव्हीलियर्सने बुधवारी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ३४ वर्षांच्या डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारात एकूण 420 सामने खेळताना २० हजाराहून जास्त धावा केल्या. यामध्ये ४७ शतकांचा समावेश आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकापूर्वीच डीव्हिलियर्सच्या अचानक निवृत्ती घेण्याच्या निर्णयामुळे अनेक क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे, तर सर्व स्तरांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, इतकी वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर आपल्याला आता थकवा जाणवत आहे. शिवाय, नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज असल्यामुळे आपण क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे डीव्हिलियर्सने म्हटले आहे. हा निर्णय अत्यंत कठीण होता. मी त्यावर दीर्घकाळ विचार केला. क्रिकेटमध्ये वरच्या स्तरावर खेळत असतानाच निवृत्त व्हायचे असे मला वाटत होते, असंही डीव्हिलियर्सने म्हटलं.
मात्र, डीव्हिलियर्सने केवळ क्रिकेटच्या मैदानावरच आपला ठसा उमटवला असं नाहीये. क्रिकेटव्यतिरिक्त अनेक खेळांमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व तर केलंच शिवाय या खेळांमध्येही त्याने आपल्या नावावर अनेक विक्रम केले. डीव्हिलियर्स हा क्रीडा क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व होता .
क्रिकेटशिवाय या खेळांमध्ये डीव्हिलियर्सचा ठसा –
– राष्ट्रीय ज्युनियर हॉकी संघात निवड
– राष्ट्रीय ज्युनियर फुटबॉल संघात निवड
– ज्युनियर रग्बी संघाचा कर्णधार
– दक्षिण अफ्रीकाच्या ज्युनियर डेव्हिस कप टेनिस टीमचा सदस्य
– पोहण्याचे सहा शालेय विक्रम डीव्हिलियर्सच्या नावावर
– ज्युनियर लेवल 100 मीटर शर्यतीत दक्षिण आफ्रिकेचा सर्वाधिक वेगवान धावपटू
– एक उत्तम गोल्फ खेळाडू
– अंडर-19 बॅडमिंटन चॅम्पियन
– दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांच्याकडून विज्ञान प्रकल्पासाठी पदक जिंकलं होतं.