Menu

देश
दगडफेकीमुळे सीआरपीएफच्या वाहनाला अपघात, १९ जवान जखमी

nobanner

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार जवानांना घेऊन हे वाहन श्रीनगरकडे जात होते. वाहनावर अचानक दगडफेक सुरू झाली. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ती उलटली. या वाहनातून प्रवास करत असलेले १९ जवान जखमी झाले.

गेल्या काही दिवसांपासून दगडफेकीच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. महिन्या सुरूवातीलाच तामिळनाडूतून आलेल्या एका पर्यटकाचा दगडफेकीत मृत्यू झाला होता. त्यापूर्वी दंगेखोरांनी एका स्कूल बसवर दगडफेक केली होती. यात काही विद्यार्थी जखमी झाले होते.

तत्पूर्वी मेहबुबा मुफ्ती सरकारने २००८ ते २०१७ दरम्यान दगडफेकीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या ९७३० लोकांवरील खटले मागे घेतले होते. यामध्ये अनेक जण पहिल्यांदाच गुन्हेगारी कृत्यात सहभागी झाले होते