Menu

देश
भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक, 11 EVM बंद पडले

nobanner

भंडारा-गोंदिया आणि पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानाला सुरुवात झाली असून पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी 31 मे रोजी जाहीर होईल.

या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाईड पेपर ट्रेल) मशीनचा वापर करण्यात येत आहे. व्हीव्हीपॅट मशीन्स सुरत आणि बडोदा येथून आणण्यात आली आहेत.

संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार असून नक्षलग्रस्त मोरगाव अर्जुनी तालुक्यात मात्र दुपारी तीन वाजेपर्यंतच असेल.

एकूण दोन हजार 126 मतदान केंद्र असून 17 लाख 48 हजार 677 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी 12 डिसेंबर 2017 रोजी राजीनामा दिला होता. 14 डिसेंबर 2017 रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.