अपराध समाचार
लोणावळ्यात भीषण अपघातात तीन वर्षीय मुलीसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू
- 215 Views
- May 23, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on लोणावळ्यात भीषण अपघातात तीन वर्षीय मुलीसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू
- Edit
जुन्या मुंबई-पुणे मार्गावर कार आणि दुचाकीच्या भीषण अपघात तीन वर्षीय मुलीसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात आज पहाटे तीनच्या सुमारास वाकसाई गावाजवळ झाला. अपघातात मृत पावलेली व्यक्ती आपल्या दोन मुलींसोबत दुचाकीवरुन जात असताना अचानक भरधाव वेगाने जात असलेल्या कारने त्यांना धडक दिली. साबु भीमन्ना भंडारे असं मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव असून, त्यांची तीन वर्षांची मुलगी पूजा भंडारे हिचाही मृत्यू झाला आहे. दुसरी मुलगी भागामा अपघातात जखमी झाली आहे.
हनुमंता भीमन्ना भंडारे यांनी यासंबंधी लोणावळा ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. लोणावळा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात आरोपीचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे तीनच्या सुमारास मयत वडील साबु भीमन्ना, पूजा साबु भीमन्ना आणि जखमी भागामा वय -१२ हे दुचाकी क्रमांक एम-एच १४ बी-क्यू २१५५ वरून जात होते. त्यावेळी वाकसाई गावाजवळ येताच भरधाव वेगात असणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात मुलीसह वडिलाचा जागीच मृत्यू झाला. तर भागामा ही गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.