खेल
Pro Kabaddi Season 6 Auction Live Updates – जाणून घ्या कोणता खेळाडू कोणत्या संघात? कोणावर किती लाखांची बोली??
आयपीएलचा अकरावा हंगाम संपल्यानंतर आता देशभरातील क्रीडाप्रेमींना वेध लागले आहेत ते प्रो-कबड्डीचे. गेल्या काही वर्षांमध्ये प्रो-कबड्डीने देशभरातील क्रीडाप्रेमींची पसंती मिळवली आहे. आतापर्यंत या स्पर्धेचे ५ हंगाम यशस्वीरित्या पार पडले आहेत, यामधील सामन्यांनाही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेट नंतर भारतात प्रेक्षकांची सर्वात जास्त पसंती मिळालेला कबड्डी हा पहिला खेळ ठरला आहे. १९ ऑक्टोबरपासून प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. सहाव्या हंगामासाठीचा लिलाव आज मुंबईत पार पडला जाणार आहे, या लिलावाच्या सर्व अपडेट्स तुम्ही लोकसत्ता.कॉमवर पाहू शकणार आहात.
सहाव्या हंगामासाठी काही संघांनी आपल्या आवडत्या खेळाडूंना संघात कायम राखलं आहे, तर काही खेळाडूंनी एकाही खेळाडूंनी कायम न ठेवता संपूर्णपणे नव्या रणनितीने मैदानात उतरण्याचं ठरवलं आहे.
संघांनी कायम राखलेले खेळाडू पुढीलप्रमाणे –
बंगाल वॉरियर्स – सुरजित सिंह, मणिंदर सिंह
बंगळुरु बुल्स – रोहीत कुमार
दबंग दिल्ली – मिराज शेख
गुजरात फॉर्च्युनजाएंट – सचिन तवंर, सुनील कुमार, महेंद्र राजपूत
हरयाणा स्टिलर्स – कुलदीप सिंह
पटणा पायरेट्स – प्रदीप नरवाल, जवाहर डागर, मनिष कुमार, जयदीप
पुणेरी पलटण – संदीप नरवाल, राजेश मोंडल, गणेश मोरे, गिरीश एर्नाक
तामिळ थलायवाज – अजय ठाकूर, अमित हुडा, सी. अरुण
तेलगू टायटन्स – निलेश साळुंखे, मोहसीन मग्शदुलू