Menu

अपराध समाचार
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत लाच घेताना अटक

nobanner

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना ३५ लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. दुपारी तीनच्या सुमारास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही कारवाई केली. पालिकेच्या मुख्यालयातच घरत यांना लाच घेताना अटक केल्याचे सांगण्यात येते. अनधिकृत बांधकामाविरूद्ध कारवाई करू नये म्हणून घरत यांनी ३५ लाख रूपयांची लाच मागितली होती. यातील ५ लाख रूपये स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले आहे. मोठ्या पदावरील अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीवरून एसीबीकडून चौकशीही करण्यात आली होती. पालिकेच्या निवडणुकीदरम्यान शिवीगाळ, इंजिन घोटाळा, परिवहन घोटाळा, डिझेल फिल्टर घोटाळा आदी प्रकरणांमध्ये त्यांचे नाव चर्चेत आले होते. घरत हे कल्याण डोंबिवली महापालिकेतील जुने अधिकारी समजले जातात.